गोव्यातलं 28वं केसरबाई केरकर स्मृती संमेलन

November 18, 2008 7:49 AM0 commentsViews: 15

18 नोव्हेंबर, गोवा गोव्यात पणजीमध्ये नुकतंच 28वं केसरबाई केरकर स्मृती संमेलन पार पडलं. कला अकादमीचे अध्यक्ष आणि गोवा विधानसभा सभापती प्रतापसिंग राणे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. पणजीतल्या दीनानाथ मंगेशकर हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात अनेक नामवंत शास्त्रीय गायक आणि वाद्य कलाकारांनी हजेरी लावली. सतार वादक रवींद्र चारी यांच्या वादनानं संमेलनाची सुरुवात झाली. डॉ. राजा काळे यांचं गायनही कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं.

close