स्टीव्ह जॉब्ज यांचं चरित्र मराठीत

October 24, 2011 5:41 PM0 commentsViews: 5

24 ऑक्टोबर

ऍपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचं चरित्रं जगभरात एकाचवेळी प्रकाशन होणार आहे. विशेष म्हणते ते मराठीत ही प्रसिध्द होणार आहेत. वॉल्टर आयझॅकसन या लेखकाने ही बायोग्राफी लिहली आहे. आयझॅकसन यांनी सीबीएस प्राईम या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या न्यूज चैनलला मुलाखत दिलीय. या मुलाखतीत त्यांनी स्टीव्ह जॉब्ज एक माणूस म्हणून कसा होता, हे सांगितलंय. स्टीव्हच्या वागण्यात आपमतलबीपणा होता. तो फार कठोर होता. एवढंच नाही तर तो आपल्या सहकार्‍यांनाही विशेष महत्त्व द्यायचा नाही, असं आयझॅकसननं सांगितलं आहे. पण काही अवगुण असले तरी त्याच्यात अनेक चांगल्या गोष्टी होत्या, असंही या लेखकाने सांगितलं. डोक्यात पैशाची हवा शिरू नये, याची जॉब्सला चांगली जाणीव होती. त्यामुळेच तो एका साध्या घरात रहायचा त्याची रहाणीही साधीच होती, असं आयझॅकसन यानी सांगितलं.

close