कार आणि होमलोन महागणार ?

October 25, 2011 9:21 AM0 commentsViews: 4

25 ऑक्टोबर

ऐन दिवाळीत कार आणि होमलोन घेणार्‍यांना आरबीआयने महागड गिफ्ट ग्राहकांना दिले आहे. रिझर्व बँकेचं तिमाही पतधोरण जाहीर झालं आहे. यात रेपो रेट म्हणजेच रिझर्व बँक बँकांना ज्या व्याजदराने कर्ज देते तपाव म्हणजेच 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. आता हा रेट 8.5 इतका झाला आहे. यामुळे होमलोन, कारलोन महागण्याची शक्यताआहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याचं बँकेनं सांगितलं आहे. रिझर्व्ह बँकेने केलेली गेल्या 13 महिन्यांमधली ही 19 वी दरवाढ आहे. मात्र डिसेंबरनंतर महागाई कमी झाली तर रेपो रेटही कमी होऊ शकतो, असं आरबीआयने सांगितलं आहे. येत्या दोन महिन्यांत चलनवाढीचा दर चढाच राहणार असल्याचे आरबीआयनं म्हटलं आहे. विकासदर जाहीर करूनही चलनवाढीची चिंता असल्याचंही आरबीआयनं या धोरणात म्हटलं आहे.

close