किल्ले तयार करण्यात बच्चे कंपनी मग्न

October 25, 2011 7:45 AM0 commentsViews: 11

25 ऑक्टोबर

दिवाळीला फराळ, रांगोळ्या, आकाशकंदिलासोबत उत्सुकता असते ती किल्ले बनवण्याची.. कोल्हापुरात बच्चेकंपनी किल्ले बांधणीच्या कामात गुंतली आहे. परीक्षा संपेपर्यंत कोणते किल्ले उभारायचे हा विचार करण्यात सर्वजण गुंगलेले असतात. दिवाळीपर्यंत वेगवेगळ्या किल्ल्यांना असणार्‍या महत्वानुसार या किल्ल्यांची माहिती गोळी करतात आणि नंतर तोच किल्ला बांधला जातो. दगड ,माती , विटा आणि विविध साहित्यापासून बनविलेले किल्ले पाहणार्‍याला थक्क करुन सोडतात. किल्ल्याचे रक्षण करणारे मावळेही यामध्ये रक्षण करतांना दिसतात. शिवशाहीचे प्रतीक असलेले गडकिल्ले हे मुलांच्या आकर्षणाचा विषय. दरवर्षी रायगड, सिंहगड, प्रतापगड, शिवनेरी असे वेगवेगळे किल्ले उभारण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

close