भाईंदरमध्ये ‘आदर्श’ शाळेत दिवाळी पहाट साजरी

October 25, 2011 11:27 AM0 commentsViews: 8

25 ऑक्टोबर

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भाईंदरमधील आदर्श विद्यानिकेतन शाळेत दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. यानिमित्त मुलांनी शाळेच्या आवारात किल्ला दर्शन,पणत्या,आकाश कंदील,रांगोळी काढली होती. विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन रद्दी पेपर गोळा करुन ते पैसे भाऊबीज म्हणून पुण्यातल्या कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला दिले. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे,आणि यामुळंच दिवाळीचं महत्व मुलांना राहिलेलं नाही.आजकाल फक्त नवीन कपडे, फटाके फोडणे म्हणजे दिवाळी असा समज झाला आहे. पण प्रदूषणमुक्त दिवाळीतही मजा काही औरच असते हा विचार शाळेनं या उपक्रमाच्या माध्यमातून समजावून सांगितला. बहुतेक शाळांत ख्रिसमस,न्यू इयर सेलीब्रशन करण्यांत येतं. पण मराठमोळया दिवाळी सणाचा आनंदही या मुलांनी लुटला.

close