उध्दव ठाकरेंनी सुक्या धमक्या देऊ नये – नितेश राणे

October 25, 2011 11:47 AM0 commentsViews: 2

25 ऑक्टोबर

उद्धव ठाकरेंनी मराठीच्या मुद्दयावर सुक्या धमक्या देण्यापेक्षा मराठी माणसाची मुंबईत अशी अवस्था का झालीय हे त्यांनी आत्मपरिक्षण करावे असा टोला नितेश राणे यांनी लगावला. संजय निरूपम आणि उद्धव ठाकरे यांच्यात सोमवार पासून सुरू झालेल्या शाब्दिक युध्दात आता नितेश राणेंनी देखील उडी घेतली. शिवसेनेने स्वत:च्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष दिल्याने त्यांनी मराठी माणसाची आज ही अवस्था केली असा आरोप नितेश राणेंनी केला. मुंबईत उरलेल्या 27 टक्के माणसाच्या प्रगतीसाठी त्यांच्या कार्यक्रम हाती घ्या संजय निरूपम यांच्या वक्त्ंाव्याला किती महत्व द्यायचे असा सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत.

close