सरपंचांचे अपहरणकरून 47 लाख रुपये लुटले

October 31, 2011 10:26 AM0 commentsViews: 1

31 ऑक्टोबर

पुणे जिल्हातील मुळशी तालुक्यातील दासवे गावचे सरपंच शंकर ढेंगळे यांचे काल रविवारी रात्री मोटरसायकलवरुन आलेल्या पाच अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची तक्रार सरपंचानी वारजे पोलीस ठाण्यात केली आहे. सरपंच शंकर ढेंगळे यांचं राहत्या घरातून अपहरण करण्यात आलं होतं. त्यांनंतर त्यांना पिंरगुट जवळच्या मुठा गावातील अपहरणकर्ते घेऊन गेले. त्यांनंतर अपहरणकर्त्यांनी दमदाटीकरून त्यांच्याकडून तिजोरीच्या चाव्या घेतल्या आणि 47 लाख रूपयांची रोख रक्कम चोरी केली अशी तक्रार ढेंगळे यांनी पोलिसांकडे केली. याप्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत आहे.

close