भिवंडीत इमारत कोसळून 2 ठार

October 25, 2011 2:41 PM0 commentsViews: 4

25 ऑक्टोबर

देशभरात दिवाळीचा आनंद उत्सव साजरा होतं आहे तर आज भिवंडीत एकाच इमारतीमधील 16 कुटुंबीयांवर काळाने झडप घातली आहे. भिवंडीमधील नवी वस्ती इथं तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दूर्घटनेते 2 जण ठार झालेत तर 4 जण गंभीर जखमी झाले आहे. या इमारतीत 16 कुटुंब राहत होती. गौतम कंपाऊंड इथली ही घटना आहे. या दुर्घटनेतील चारही गंभीर रूग्णांना ठाणे सिव्हीलला हलवण्यात आलं आहे. तर ढिगार्‍याखाली आणखीही काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या पथकांकडून बचावकार्य सुरू आहे.

close