…तो आपली आतडी सांभाळत रस्त्यावर फिरतोय !

October 31, 2011 10:35 AM0 commentsViews: 23

31 ऑक्टोबर

नाशिकमध्ये एक नऊ वर्षांचा मुलगा आपल्या पोटातली आतडी सांभाळत फिरतांना आढळून आला आहे. अकबर शेथ असं या मुलाच नाव आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे या मुलावर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार झाले आणि त्यानंतर त्याला ताबोडतोब डिस्चार्जही देण्यात आला. या अवस्थेत डॉक्टरांनी, त्याला डिस्चार्ज दिला तरी कसा ? असा प्रश्न आता विचारण्यात येतोय. दरम्यान काही लोकांना अकबर या अवस्थेत बसलेला दिसल्यानंतर त्यांनी त्याला पुन्हा सिव्हील हॉस्पिटलमधे दाखल केलं. पण अकबर हॉस्पिटलमध्ये नाही आणि तो पळून गेल्याचं आता हॉस्पिटलच्या कर्मचार्‍याकंडून सांगण्यात येतंय.

close