मनमाडकरांना पाणीपुरवठा खात्याकडून दिवाळी भेट

October 25, 2011 2:59 PM0 commentsViews: 6

25 ऑक्टोबर

नाशिक जिल्ह्यातील मनमाड मध्ये नागरिकांना पंधरा-पंधरा दिवस पाण्याविना काढावे लागतात. याविरोधात अनेक आंदोलनंसुध्दा झाली. एवढ्या वर्षांनंतर आता हा पाण्याचा प्रश्न सुटेल अशी शक्यता निर्माण झाली. यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा खात्याने विशेष योजना मंजूर केली. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी 46 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातून पाटोदा धरणाची साठवणूक क्षमता वाढवण्यात येणार आहे. सध्या धरणात 5 दशलक्ष घनफूट एवढे पाणी साठवता येत होतं. त्यामुळे मनमाडकरांना 10-10 दिवस पाण्याशिवाय काढावे लागत होते. पण आता या योजनेमुळे ही क्षमता 25 दशलक्ष घनफूट करण्यात आली. या कामासाठी 6 महिने लागणार आहेत. पण त्यातलं पाणी मनमाडकरांना 2 वर्षांनंतर मिळणार आहे.

close