अण्णा मौन सोडणार

October 31, 2011 11:07 AM0 commentsViews: 7

31 ऑक्टोबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे लवकरच आपलं मौन सोडणार आहे. अण्णांनी ब्लॉगवरुन ही घोषणा केली. तीन-चार दिवसात मौन सोडणार असल्याचं अण्णांनी ब्लॉगमध्ये लिहलं आहे. त्यानंतर देशभर दौरे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जनलोकपाल नंतर राईट टू रिजेक्ट आणि राईट टू रिकॉलसाठी लढा सुरू करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अण्णा 16 ऑक्टोबरपासून मौनात आहेत. उपोषणामुळे प्रकृती खालावली आहे. ती सुधारावी यासाठी मौन व्रत घेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण टीम अण्णांच्या सदस्यांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आणि अण्णांनी मौन धारण करण्याची वेळ यावरुन अनेक आरोपसुद्धा झाले. या आरोपांनी अण्णांनी ब्लॉगवरुनच उत्तरही दिली. पण आता मौन सोडणार असल्याचं अण्णांनी जाहीर केलं.

close