हॅपी बर्थ डे मिकी

November 18, 2008 9:00 AM0 commentsViews: 5

18 नोव्हेंबर, मुंबई छोट्या दोस्तांबरोबर मोठ्यांचाही लाडका मिकी माऊस 80 वर्षांचा झालाय. वॉल्ट डिस्नेचं हे अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर सर्वांत पहिल्यांदा 18 नोव्हेंबर 1928 साली कार्टून 'स्टीमबोट विली'मधून प्रेक्षकांना माहिती झालं. मिकी माऊस हे वॉल्ट डिन्सेचं मेन कॅरेक्टर आहे.त्याचा जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून आजतागायत त्याची लोकप्रियता टिकून आहे,असं म्हणायला काहीच हरकत नाही. मिकी माऊसचं डिझाईन वॉल्ट डिन्से यांना प्रवासात सुचलं. मिकी माऊसने आधीच्या ऑसवर्ल्ड रॅबीटची जागा घेतली आणि त्याला या सशापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे.

close