‘एफ 1′ राज्यात होणार होती,पण..!

October 31, 2011 11:37 AM0 commentsViews: 1

31 ऑक्टोबर

देशातील सर्वात महागड्या आणि वेगवान अशा थराराची भारतीयानी मागिल तीन दिवसात अनुभव घेतला. काल रविवारी भारतात झालेल्या पहिल्या ग्रांप्रिची मोठ्या रोमांचक वातावरणात सांगता झाली. पण हाच थरार मुंबईकरांच्या नशिबी होता पण तो महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हिरावून घेतला असा नवा खुलासा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केला. तसेच रविवारी बुध्दा सर्कीटवर झालेल्या एफ 1 च्या यशाचं श्रेय हे प्रामुख्याने उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनाच द्यायला हवं असं मतही भुजबळ यांनी व्यक्त केलं. एफ 1 चा हा ट्रॅक महाराष्ट्रात होणार होता. यासाठी मी स्वत: पुढाकार घेतला होता. त्यावेळच्या दोन मुख्यमंत्र्याकडे मी सात्यत्याने पाठपुरावा करत होतो पण आवश्यक ती मदत एफ 1 ला मिळालीच नाही अशी खंतही जाहीर रीत्या छगन भुजबळ यांनी फक्त आयबीएन लोकमतकडे बोलून दाखवली.

close