‘रोहयो’वरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मतभेद

October 31, 2011 8:06 AM0 commentsViews: 97

31 ऑक्टोबरराज्यातल्या रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी 12 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याविषयी खंत व्यक्त केली होती. तसेच ही योजना राज्याच्या ग्रामविकास खात्याला चालवायला का देऊ नये अशी विचारणा राज्यसरकारला केली. यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 17 सप्टेंबरला जयराम रमेश यांना पत्र लिहून ही योजना नीट चालत असल्याचा निर्वाळा दिला. तसेच जयराम रमेश यांनी नमूद केलेले 11 आक्षेपांचं मुख्यमंत्र्यांनी खंडन केलं. राज्यातील रोहयाची नरेगाप्रमाणे नीट अंमलबजावणी होत नाही त्यामुळे ही योजना रोजगार व जलसंधार खात्याकडून ग्रामविकास खात्याकडे राबवायला द्यावी अशी भूमिका राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी माझ्याकडे मांडली आहे असंही जयराम रमेश यांनी पत्रात नमूद केलेलं आहे त्यामुळे रोहयोवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतली रस्सीखेचाची केंद्रसरकारने दखल घेतल्याचं समोर आलं आहे.

close