सिंधुदुर्गात तापाने घेतला 22 जणांचा बळी

October 31, 2011 2:49 PM0 commentsViews: 4

31 ऑक्टोबर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अज्ञात तापाचं थैमान घातला आहे. या तापामुळे आतापर्यंत तब्बल 22 रूग्ण दगावले आहेत. गेली तीन वर्ष सिंधुदुर्गात तापाने बळी जात आहे. पण जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अजून सक्षम नाही. ऑक्सिजन,औषधे आणि व्हेंटिलेटरसारख्या सुविधा नाहीत. सध्या कणकवलीच्या उपजिल्हा रूग्णालयात तापाच्या 30 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पण हा जीवघेणा ताप नेमका कोणता आहे, हे शोधून काढण्यात यंत्रणेला अजून यश आलेले नाही.

close