वीज दरवाढीचा शॉक ; 41 पैशांनी वाढ

October 31, 2011 3:15 PM0 commentsViews: 1

31 ऑक्टोबर

अखेर महावितरणने दिवाळीनंतर ग्राहकांना दरवाढीचा झटका दिला आहे. महावितरणने प्रत्येक युनिटमागे 41 पैसे वीज दरवाढ होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक युनिटमागे 41 पैसे जास्त द्यावे लागणार आहेत. मात्र ही दरवाढ महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मंुबई वगळता राज्यातील उर्वतरित वीज ग्राहकांना लागू होणार आहे. उद्यापासून महावितरण कंपनीच्या ग्राहकांना सरासरी 41 पैसे प्रति युनिट जादा मोजावे लागणारे आहेत. त्यातही घरगुती वीज वापरणार्‍या सर्व सामान्य ग्राहकांना 44 पैसे प्रतियुनिट जादा ज्यादा द्यावे लागणार आहेत ही दरवाढ 1 नोव्हेंबरपासून म्हणजेच मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. महावितरण कंपणीने 5,155 कोटी रुपयांची वीज दरवाढ मागितली होती. पण, एमईआरसीने 3265 कोटी रुपयांच्या दरवाढीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

close