चित्रपती व्ही. शांताराम यांचा स्मृतिदिन

November 18, 2008 9:07 AM0 commentsViews: 5

18 नोव्हेंबर, मुंबई राजाराम वानकुंद्रे शांताराम म्हणजे व्ही. शांताराम. 18 नोव्हेंबरला हा त्यांचा जन्मदिवस. 18 नोव्हेंबर 1901मध्ये त्यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला. चित्रपती व्ही. शांताराम यांनी जवळजवळ सहा दशकं मराठी-हिंदी सिनेसृष्टीवर राज्य केलं.पद्म विभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार असे अनेक गौरव मिळालेले व्ही. शांताराम म्हणजे सिनेमाची चालतीबोलती शाळाच. मग तो सिनेमा मराठी असो किंवा हिंदी.त्यांनी बनवलेल्या कुठल्याही सिनेमात एक सामाजिक संदेश असायचाच. त्याबरोबर माणुसकीचं दर्शनही त्यांच्या सिनेमात्यामुळेच 'डॉ. कोटनीस की अमर कहानी'पासून पिंजरापर्यंत प्रत्येक सिनेमा प्रभाव पाडतो. मनावर ठसतो आणि इतक्या वर्षांनीही व्ही. शांताराम यांचे सिनेमे लक्षात राहतात. चित्रमहर्षीच्या जन्मदिनी त्यांना आयबीएन लोकमतची भावपूर्ण आदरांजली.

close