माथेरानची मिनी ट्रेन होणार लक्झरी

October 31, 2011 3:02 PM0 commentsViews: 41

31 ऑक्टोबर

माथेरान हे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिध्द आहेच, पण या हिल स्टेशनवर घेऊन जाणा-या मिनी ट्रेनसाठी सुध्दा प्रसिध्द आहे. हीच मिनी ट्रेन आता आपलं जुनं रुप सोडणार आहे. या मिनी ट्रेनमध्ये आता असणार आहेत लक्झरी डब्बे. या मिनी ट्रेनला आता आठ लक्झरी डब्बे असतील या डब्ब्यांमध्ये मोबाईल चार्जिंगची सोय असेल. लक्झरी डब्ब्यामध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणी असेल. प्रथम श्रेणीच्या डब्यात 20 सीट्स तर द्वितीय श्रेणीच्या एका डब्यात 25 सीट्स असतील. ही लक्झरी मिनी ट्रेन दिवसातून पाच वेळा नेरळ ते माथेरान असा प्रवास करेल. या मिनीट्रेनची दखल याआधीच युनेस्कोनं घेतलेली आहे आणि या ट्रेनला जागतिक दर्जा देण्यावरही विचार सुरु आहे. हा दर्जा मिळेल तेव्हा मिळेल पण सध्या या ट्रेननं प्रवासाचा दर्जा लक्झरी करुन प्रवाशांची सुट्टी स्पेशल केलीये हे नक्की..

close