रोहयोवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जुंपली

November 1, 2011 9:53 AM0 commentsViews: 2

01 नोव्हेंबर

रोजगार हमी योजनेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीत वाद पेटला आहे. आता या वादात रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांनी उडी घेतली आहे. जर कोणाला वाटत असेल की रोजगार हमी योजना हे खातं आपल्याकडे असावं तर ते सोडायला माझी तयारी आहे पण ते खातं नीट सुरू राहील याचीही सवय लावा असा टोलाही राऊत यांनी लगावला. राज्य अंधारात असताना राज्यातला अंधार आधी दूर करावा आणि मग हे खातं जरूर मागा असा सल्लाही राऊतांनी दिला. आणि एखादं सुंदर मुलं असेल तर ते सगळ्यांनाच हवं असतं तशीच ही परिस्थिती आहे असंही राऊतांनी म्हटलं आहे. रोहयोचा कारभार ग्रामविकास खात्याकडे द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीने केली होती. तसं पत्रही जयंत पाटलांनी जयराम रमेश यांना पाठवलं होतं. त्यानंतर जयराम रमेश यांनी पाठवलेल्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी उत्तरही दिलं होतं.

close