बेळगावमध्ये मराठी भाषिकांचा काळा दिवस

November 1, 2011 10:24 AM0 commentsViews: 5

01 नोव्हेंबर

1 नोव्हेंबर 1956 ला झालेल्या भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूरसह 865 बहुमराठी भाषिक गावं कर्नाटकमध्ये समाविष्ट करण्यात आली. तेव्हापासून सुतक म्हणून एक नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो. आज बेळगावमध्ये मराठी भाषिक काळे झेंडे दाखवून शहरातून सायकल फेरी काढतात. आणि केंद्र आणि राज्य सरकराचा निषेध करतात. तर दुसरीकडे कर्नाटक सरकार आजचा दिवस विजय दिवस म्हणून साजरी करुन मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जातोय.

close