शेतकरी संघटनाच शेतकर्‍यांच्या मुळावर उठली -आर.आर.पाटील

November 1, 2011 11:18 AM0 commentsViews: 2

01 नोव्हेंबर

संपुर्ण राज्यात ऊसाचे आंदोलन पेटले असतानाच आर आर पाटलांनी मात्र शेतकरी संघटनेवर जोरदार टीका केली. शेतकरी संघटनाच शेतकर्‍यांच्या मुळावर उठली आहे असा आरोप आर आर पाटील यांनी केला. गोपुज इथं नव्यानं सुरु होणार्‍या ग्रीन पॉवर साखर कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्रातील एकाही शेतकर्‍याचा ऊस शिल्लक राहता कामा नये अशी भुमिका राज्य सरकारने घेतली आहे. पण नैसर्गिक कारणे आणि शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे फक्त 29 कारखाने सुरु आहे तर 33 कारखाने अडचणीत आले आहेत. जर शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य केल्या तर उरलेले कारखानेही अडचणीत येतील, किंवा त्यांना बंदही करावं लागेल असं मत आबांनी व्यक्त केलं.

close