धोणी, बिंद्रा यांना लेफ्टनंट कर्नल पद बहाल

November 1, 2011 12:02 PM0 commentsViews: 16

01 नोव्हेंबर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काही दिवसांपूर्वी वायूसेनेचा ग्रुप कॅप्टन झाला. त्यानंतर आज भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी आणि ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता अभिनव बिंद्रा यांना लेफ्टनंट कर्नल हे पद बहाल करण्यात आलं आहे. स्पोर्ट्समध्ये दोघांनीही केलेल्या भरीव कामगिरीसाठी सुरक्षा मंत्रालयातर्फे त्यांना ही मानवंदना देण्यात आली. आज दुपारी नवी दिल्लीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. धोणीच्या कप्तानीखाली भारतीय टीमने याचवर्षी वर्ल्ड कप जिंकला. तर त्यानेच टीमला टेस्टमध्येही नंबर वन पद मिळवून दिलं होतं. अभिनव बिंद्रा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक गोल्ड मिळवणारा पहिला भारतीय ठरला. यापूर्वी कपिल देव आणि सचिन तेंडुलकर यांना सैन्यदलातर्फे मानद पदवी बहाल करण्यात आलीय. याशिवाय सचिन आणि धोणीच्या सुखोई सफरीलाही सुरक्षा मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

close