लवासाबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी – सुप्रिया सुळे

November 2, 2011 10:05 AM0 commentsViews: 5

02 नोव्हेंबर

पर्यावरण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी लवासाच्या अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांवर राज्य सरकार फौजदारी खटल्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. लवासा कॉर्पोरेशनचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांचाही त्यात समावेश आहे. या मुद्दयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भुमिकेकडे सर्वांचं लक्ष असताना सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. लवासा प्रकरणात अजित गुलाबचंद यांच्या चौकशीच्या मुद्द्यावर राज्य सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं सांगत स्थानिकांना रोजगार तसेच आसपासच्या गावांना विजेसारख्या पायाभूत सुविधा मिळवून देणार्‍या लवासाचे सुळे यांनी समर्थन केलं आहे.

close