पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा लाँगमार्च

November 2, 2011 10:18 AM0 commentsViews: 18

02 नोव्हेंबर

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी आज मोठ्या संख्यने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर लाँगमार्च काढण्यात आला. सकाळी नऊ वाजेपासून निघालेला मार्च दादर येथे पोहचला असता तो थांबवण्यात आला. या ठेवीदारांच्या शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निघाले आहेत. दरम्यान सकाळी चेंबुरमध्ये हा लाँगमार्च थोपवण्यात आला होता. मात्र चेंबुरमधल्या एका शाळेत सगळे मोर्चेकरी थांबलेलले असताना, पोलिसांनी सगळ्याना शाळेतून ताब्यात घेतलं. आमदार धैर्यशील पाटील यांच्यासह जवळपास 400 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. पण थोड्यावेळापूर्वी पुन्हा लाँगमार्चला परवानगी देण्यात आली.

रायगड जिल्ह्यातल्या पेण अर्बन बँकेत 598 कोटींचा घोटाळा झाला. त्यामुळे ठेवीदार संकटात सापडले. आपल्या मागण्यांसाठी या ठेवीदारांनी गणपतीच्या मूर्ती घेऊन आज लाँगमार्च काढला. दादरला किंग जॉर्ज शाळेजवळ हा मोर्चा थांबवण्यात आला. आमदार धैर्यशील पाटील यांच्यासह जवळपास 400 जणांना ताब्यात घेण्यात आलं. पण नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. 10 जणांचं शिष्टमंडळ मग सह्याद्रीवर आले. त्यांनी सरकारशी चर्चा केली. त्यावेळी सरकारनं बँक दिवाळखोरीत येऊ देणार नाही, असं आश्वासन दिलं.

पेण अर्बन बँक घोटाळा

- 598 कोटींचा घोटाळा – त्यात 733 कोटींच्या ठेवी – 1 लाख 98 हजार ठेवीदार – त्यात आदिवासी, फेरीवाले, शेतकरी, सामाजिक संस्थांचा समावेश – ठेवींमध्ये निवृत्ती वेतनाचा पैसा सर्वाधिक – रायगड जिल्ह्यात बँकेच्या 18 शाखा – घोटाळ्यामुळे 10 ते 15 लाख लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका

ठेवीदारांच्या मागण्या

- बँकेवर पूर्ण वेळ प्रशासक नेमा- प्रशासक समितीत 2 ठेवीदारांचे प्रतिनिधी घ्या- घोटाळ्याबद्दल बँकेवर कारवाई करा- रिझर्व्ह बँकेसोबत बैठक बोलवा- कर्ज वसुलीचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा

close