वार्‍यावरची वरात पुन्हा एकदा रंगभूमीवर

November 1, 2011 2:01 PM0 commentsViews: 36

01 नोव्हेंबर

पु.ल.देशपांडे यांचं अतिशय गाजलेलं नाटक म्हणजे वार्‍यावरची वरात… ही वार्‍यावरची वरात आता पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यास सज्ज आहे. नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेमार्फत येत्या 4 नोव्हेंबरला मुंबईत होणार्‍या पुलोत्सव सोहळ्यात या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. स्वत: भाई वार्‍यावरची वरात मध्ये प्रमुख भूमिकेत होते. आताच्या संचात भाईंची ही बहारदार भुमिका साकरतोय अभिनेता आनंद इंगळे. वार्‍यावरची वरातच्या पहिल्या संचात भाईंबरोबर भुमिका करणारे अभिनेते श्रीकांत मोघे यांनीच आताच्या नवीन संचातील नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. या नाटकात आनंद इंगळे बरोबर प्रदीप पटवर्धन, आतिशा नाईक, नयना आपटे, समीर चौघुले, विघ्नेश जोशी आणि स्वत: श्रीकांत मोघे भुमिका साकारत आहे.

close