‘देऊळ’च्या गाण्याला हिंदू जनजागरणचा विरोध

November 2, 2011 10:56 AM0 commentsViews: 6

02 नोव्हेंबर

देऊळ सिनेमातील 'फोडा दत्त नाम टाहो' गाण्याला हिंदू जनजागण समितीने विरोध दर्शवत हे गाणं सिनेमातून वगळण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील एक निवेदन सेन्सॉर बोर्डालासुध्दा देण्यात आलेलं आहे. देऊळ हा सिनेमा 4 नोव्हेंबर रोजी रिलीज होतोय, त्याआधीच हे गाणं तरी वगळण्यात यावं किंवा सेन्सॉर बोर्डानं 'देऊळ' चं सेन्सॉर सर्टिफिकेट रद्द करावं अशी हिंदू जनजागृती समितीची मागणी आहे. देऊळ मधील गाण्यात देवाचं विडंबन करण्यात आल्यानं भावना दुखावल्याचं हिंदू जनजागृती समितीचं म्हणणं आहे.

close