कारखानदारांनी ऊस दरवाढीचा चेंडू टोलवला सरकार दरबारी

November 1, 2011 2:07 PM0 commentsViews: 6

प्रवीण सपकाळ, सोलापूर

01 नोव्हेंबर

ऊस दरवाढीच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकरी संघटनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. शेतकर्‍यांच्या ऊसाला चांगला भाव देणं शक्या आहे मात्र सरकारच्या निर्णयामुंळे सर्वकाही अडुन राहिल्याचे स्पष्टीकरण देत कारखानदारांनी ऊसदरवाढीचा चेंडू सरकार दरबारी टोलवला.

खतांचे भाव आणि मजुरीचे दर वाढल्याने ऊसउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. एक टन उसाचं उत्पादन करण्यासाठी शेतकर्‍याला दोन हजार रुपये खर्च येतो.अशा परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या उसाला योग्य भाव द्यायला हवा, वाढीव भाव देणं हे कुण्या एका कारखान्याच्या हातात नाही असं कारखानदारांचं म्हणणं आहे.

यंदा गाळपाच्या तयारीत असलेल्या साखर कारखान्यांचा आकडा 185 वर गेला. राज्यात सर्वाधिक साखर कारखाने एकट्या सोलापूर जिल्ह्यात आहेत. या कारखानदारीत आता नव्याने 3 कारखान्यांची भर पडणार आहे. 2010 च्या गळीत हंगामात 159.27 लाख मेट्रीक टन साखर उत्पादीत करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन होत असताना साखरेवर निर्यातबंदी घालण्यात आलीय. ही बंदी हटवावी अशी साखर कारखानदारांची मागणी आहे.

सहकारी साखर कारखान्यांपुढे खासगी कारखानदारांनी मोठं आव्हान उभं केलंय. अनेक कारखानदारांची उसाला चांगला दर देण्याची तयारी आहे. पण सरकारकडून कोणतंही ठोस पाऊल उचललं जात नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरावं लागतं आहेत. सहकार चळवळीतील नेतेच खासगी कारखानदारीत उतरले आहे. त्यामुळे उसाचा दर ठरवताना दबावतंत्राचा वापर केला गेला. सरकारने या दबावापुढे न झुकता ठोस निर्णय घ्यावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

साखरेचं राजकारण

साखर कारखाने – 185 सहकारी कारखाने – 134 खासगी कारखाने – 512010 गळीत हंगाम – 159.27 लाख मेट्रिक टन

close