मंदीमळे 5 लाख उद्योग बंद

November 18, 2008 9:32 AM0 commentsViews: 4

18 नोव्हेंबर मुंबईऋतुजा मोरे भारतीय अर्थव्यवस्थेत चाळीस टक्के वाटा छोट्या आणि मध्यम उद्योगांचा आहे.जागतिक मंदीच्या काळात या उद्योग क्षेत्रालाही चांगलाच फटका बसला आहे. यावरचा एक रिपोर्ट.नानजी जयस्वाल यांचा ऑईल ड्रिलिंगसाठी लोखंडी सुटे भाग बनवण्याचा उद्योग आहे. महिन्याभरात त्यांना 2000 युनिट्स बनवण्याचं टार्गेट असतं.पण गेल्या दोन महिन्यांत त्यांच्याकडे नव्या ऑर्डर आल्याच नाही.जागतिक मंदीमुळे गेल्या सहा महिन्यात अंदाजे पाच लाख छोटे आणि मध्यम उद्योग बंद पडलेत. त्यामुळे कर्मचा-यांच्या नोकरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.कर्मचा-यांच्या कपातीसंदर्भातली ही परिस्थिती जवळपास सगळीकडे सारखीच आहे. पण त्यामुळे छोट्या आणि मध्यम उद्योगांचं 2500 कोटींचं नुकसान झालं आहे. ही नुकसानभरपाई भरून काढण्यासाठी व्याजदरात सूट मिळावी अशी मागणी या उद्योजकांनी केली आहे.जागतिक मंदीच्या काळात हे छोटे उद्योग जम बसवण्यासाठी सर्वाेपयी प्रयत्न करत आहेत. कारण त्याचा थेट परिणाम भारतीय निर्यातीवर होत आहे.

close