छटपुजेनिमित्त ‘भैय्यां’च्या स्वागतासाठी शिवसैनिक सरसावले

November 2, 2011 12:28 PM0 commentsViews: 4

02 नोव्हेंबर

दरवर्षीप्रमाणे उत्तर भारतीयांच्या छटपुजेवरून राजकीय पटलावर विरोधाचा मुद्दा उपस्थिती होतो. यंदाच्या छटपुजेवरुन उत्तर भारतीय नेते आणि शिवसेनेत वातावरण तापले असताना ठाण्यातल्या शिवसैनिकांनी उत्तर भारतीयांच्या सन्मानाचे पोस्टर लावले आहे. ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरात अशा प्रकारचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. 'उत्तर भारतीयोंके सन्मान मे शिवसेना मैदान में' असा मजकुर या पोस्टर्सवर असल्याने हे पोस्टर्स सगळ्यांचं लक्ष वेधुन घेत आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना उत्तर भारतीयांना न दुखवण्याचा पवित्रा शिवसेनेनं घेतल्याचं दिसुन येतं आहे.

close