ज्युलियन असांज यांना स्विडनकडे सोपवणार

November 2, 2011 12:58 PM0 commentsViews: 1

02 नोव्हेंबर

विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजला आज लंडन हायकोर्टाने धक्का दिला. असांजवर बलात्काराचा आरोप आहे. आणि त्याच्यावर स्वीडनमध्ये खटला चालवला जाणार आहे. या खटल्यासाठी लंडन हायकोर्टाने आज परवानगी दिली. आणि असांजला स्वीडनच्या ताब्यात देण्याच्या विरोधातली याचिका कोर्टाने फेटाळून लावली. असांजला या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकार आहे की नाही याबाबत कोर्ट तीन आठवड्यात निर्णय घेणार आहे. असांजवर लैंगिक अत्याचाराचे वेगवेगळे आरोप आहेत. पण आपण असा कोणताच गुन्हा केला नाही असं असांजचं म्हणणं आहे. विकिलिक्सवरून अनेक वादग्रस्त केबल्स उघड करून असांजनं खळबळ माजवली होती. त्यामुळे अमेरिका अडचणीत आली होती. त्यानंतर अमेरिकेने विकिलिक्सच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली. अखेर असांजला विकिलिक्स बंद करावं लागलं. असांजविरोधातल्या कायदेशीर कारवाईतही हेच राजकारण असल्याचा संशय आहे.

close