ऊस दरवाढीसाठी पंढरपूर-बारामती पदयात्रा

November 2, 2011 1:35 PM0 commentsViews: 13

02 नोव्हेंबर

ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन तीव्र केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चलो बारामतीचा नारा दिला. या संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी ऊसाच्या दरासाठी थेट केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या गावावरच धडक देण्यात येणार आहे. दुपारी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं आणि ऊसाच्या दरासाठी विठ्ठलालाच साकडं घातलं. या पदयात्रेत जवळपास पाच हजार शेतकरी सहभागी झाले आहे. ऊसाला 2 हजार 350 रुपये पहिली उचल द्यावी, अशी संघटनेची मुख्य मागणी आहे. दुसरीकडे, राजू शेट्टींनी आपलं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन राज्य सरकारनं केलंय. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या हमी भावाप्रमाणेच पहिला हफ्ता ऊस उत्पादकांना मिळेल, असं राज्य सरकारचं धोरण दिसतंय.

उसाला 2,350 रुपये पहिली उचल द्यावी अशी संघटनेची मुख्य मागणी आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. सोमवारी कोल्हापुरच्या झालेल्या 10 व्या परिषदेत ऊसउत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्या कारखाने आणि सरकारने मान्य केल्या नाहीत, तर पंढरपूर ते बारामती मोर्चा काढू असा जाहीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला होता.

उसाला पहिली उचल 2,350रू. आणि अंतिम भाव 2, 700 रु दिला नाही, तर कुठलाही शेतकरी तोड होऊच देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. सहकारी साखर कारखाने मोडून खाणार्‍या नेत्यांची सीबीयाय चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी जमलेल्या शेतकर्‍यांना शपथ देत संघटनेनं अनेक महत्त्वाचे ठरावही पास केले. या परिषदेला ऊसउत्पादक शेतकर्‍यांचा मोठ्या सख्येनं हजेरी लावली होती.

close