‘झोपी गेलेला जागा झाला’ नाटक पुन्हा रंगभूमीवर

November 2, 2011 3:07 PM0 commentsViews: 34

02 नोव्हेंबर

सुबक निर्मित हर्बेरियम उपक्रमातील शेवटचं पान अर्थात पाचवं नाटक 'झोपी गेलेला जागा झाला' हे बबन प्रभूचं गाजलेलं नाटक 5 नोव्हेंबरला पुन्हा एकदा रंगभूमीवर येतं आहे. बबन प्रभू लिखीत आणि आत्माराम भेंडे दिग्दर्शित या गाजलेल्या नाटकाचं यावेळी दिग्दर्शन करतायत विजय केंकरे. बबन प्रभूंनी रंगवलेला इरसाल दिनू यावेळी रंगवतोय अभिनेता भरत जाधव आणि महत्वाचे म्हणजे अभिनेता सुनिल बर्वे यावेळी फक्त निर्मात्याच्या भूमिकेत न राहता आपल्या या उपक्रमातील शेवटच्या नाटकात विनूची भूमिका करतोय. याबरोबर अभिनेते विजू खोटे, सतिश पुळेकर, भार्गवी चिरमुले, संपदा जोगळेकर, संतोष पवार असे एक से एक कलाकार या नाटकात भूमिका करत आहे.

close