कनिमोळींचा तिहारमध्ये मुक्काम वाढला

November 3, 2011 1:03 PM0 commentsViews: 2

03 नोव्हेंबर

2 जी घोटाळ्या प्रकरणी द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांचा तिहारमधला मुक्काम वाढला आहे. ट्रायल कोर्टाने कनिमोळी यांच्यासह आणखी सात जणांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. 11 नोव्हेंबरपासून खटला सुरू करण्याचे आदेश न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी निकालात म्हटलं आहे. सर्व आरोपींनी सार्वजनिक पैसा स्वतःसाठी वापरून जाणूनबुजून आर्थिक गुन्हा केला असं न्यायाधीशांनी निकालात म्हटलं आहे. कनिमोळी यांच्यासह माजी दूरसंचार मंत्री ए राजांचे खासगी सचिव आर के चंडोलिया, माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरा, स्वान टेलिकॉमचे शाहीद बलवा, कुसेगाव फ्रूटचे राजीव अगरवाल, सिनेयुगचे करीम मोरानी आणि कलाईग्नार टीव्हीचे एमडी शरद कुमार यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. या निकालाविरोधात आरोपी हायकोर्टात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या 5 महिन्यांपासून कनिमोळी तिहार जेलमध्ये आहेत.

close