चंद्रपूर वनक्षेत्रातील वाघाच्या बछड्याचा मृत्यू

November 18, 2008 7:53 AM0 commentsViews: 2

18 नोव्हेंबर नागपूरकाही दिवसापूर्वी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपूरी वन परिक्षेत्रात सापडलेल्या वाघाच्या दोन बछड्यांपैकी एका बछड्याचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी वाघाची दोन बछडे मरणासन्न अवस्थेत गावक-यांना सापडली होती. त्यापैकी एका पिल्लाची तब्येत खूपच खराब होती. त्या बछड्यांना नंतर वन विभागानं नागपूरमध्ये उपचारासाठी आणलं. यापैकी एकाची तब्येत खूपच खराब होती. या बछड्याला वाचवण्यासाठी त्याला रक्तही देण्यात आलं होतं. मात्र उपचारा दरम्यान त्या बछड्याचा मृत्यू झाला. या बछडयाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले परंतु त्यात त्यांना यश आलं नाही.

close