लवासावर कारवाईला सरकारचा हिरवा कंदील

November 3, 2011 1:42 PM0 commentsViews: 3

03 नोव्हेंबर

पर्यावरण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी लवासा कॉर्पोरेशनाच्या पदाधिकार्‍यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरु करायला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तसे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहे. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आजच, फौजदारी खटला दाखल करण्याचा अर्ज पुणे कोर्टात दाखल केला जाणार आहे. लवासाच्या अधिकार्‍यांविरोधात कारवाई करण्यासाठीची मुदत आज संपत आहे.

close