शरद पवारांच्या कार्यालयावर दगडफेक

November 3, 2011 9:36 AM0 commentsViews: 2

03 नोव्हेंबर

सोलापुरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसदरासाठी आंदोलन करत शहरातील केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचं संपर्क कार्यालयावर दगडफेक केली. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी शहरात वाढीव ऊसदरासाठी शिवसेनेनं ठिय्या आंदोलन केलं. सुरुवातीला शांततामय मार्गानं हे आंदोलन सुरू होतं. पण नंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पवारांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला चढवला. कार्यलयावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत कार्यालयाच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले. मात्र ही दगडफेक शिवसेनेनं नव्हे तर राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी केली, सेनेचे ठिय्या आंदोलन सुरु होतं ते झाल्यांनंतर सेनेच्या नावाचा कांगावा करत राष्ट्रवादीने हा प्रकार केल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी केला. मात्र हा प्रकार का घडला यांची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. राष्ट्रवादीकडून हा हल्ला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला असं सांगण्यात आलं आहे तर शिवसेनेचे संपर्कप्रमुख पुरषोत्तम बर्डे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.

close