अजित पवारांनी घेतली अण्णांची भेट

November 3, 2011 9:59 AM0 commentsViews: 2

03 नोव्हेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार राळेगणमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवारांनी अण्णांची भेट घेतली. यावेळी अण्णांसोबत बबनराव पाचपुतेही हजर होते. अण्णांनी राज्यात सक्षम लोकायुक्त विधेयक मंजूर करण्याबाबत मुख्यंमत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर एक महिन्यापूर्वीच हा दौरा ठरला होता. दरम्यान अण्णा उद्या मौन सोडणार आहेत. पण आज संध्याकाळीच ते दिल्लीला जाणार आहेत. संसदेच्या स्थायी समितीसमोर उद्या ते आपलं म्हणणं मांडणार आहेत. पण मौन सोडण्याबद्दल अजून स्पष्टीकरण मिळालेलं नाही. अण्णा दिल्लीत मौन सोडणार की राळेगणमध्ये मौन सोडणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

close