बेळगाव पालिकेत कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस

November 3, 2011 10:16 AM0 commentsViews: 7

03 नोव्हेंबर

बेळगाव महापालिका कार्यालयावर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. महापौर आणि उपमहापौरांच्या केबिनवर हा हल्ला करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी महापालिकेतल्या मराठी पाट्यांना काळं फासलं, तसेच फर्निचरची मोडतोड केली. 1 नोव्हेंबरला महापौर आणि उपमहापौर यांनी काळ्या दिवासाच्या रॅलीत भाग घेतला होता म्हणून हा केला हल्ला करण्यात आला. याप्रकरणी कन्नड रक्षक वेदिकेच्या 60 कार्यकर्त्यांना बेळगाव पोलिसांनी अटक केली. या सर्व प्रकाराचा निषेध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीनं उद्या बेळगाव बंदची हाक दिली.

1 नोव्हेंबर 1956 ला झालेल्या भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूरसह 865 बहुमराठी भाषिक गावं कर्नाटकमध्ये समाविष्ट करण्यात आली. तेव्हापासून सुतक म्हणून एक नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो. तर कन्नड भाषीक ही दिवस विजय दिन म्हणून साजरा करतात. यादिवशी मराठी भाषिकांनी काळे झेंडे दाखवून शहरातून सायकल फेरी काढली होती. याच्यानिषेध करत कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला.

close