बालविवाह प्रथेबाबत राजस्थानच्या पक्षांमध्ये उदासिनता

November 18, 2008 9:26 AM0 commentsViews: 110

18 नोव्हेंबर अजमेरराजस्थानमध्ये 4 डिसेंबरला निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रचाराला आता वेगळाच रंग चढला आहे. राजस्थानमधला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बालविवाह. पण मतदारांची जास्तीत जास्त मतं मिळवीत म्हणून राजकीय पक्ष या प्रश्नांकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. देव उठणी एकादशी पूर्वी जिल्हा प्रशासनानं कुठे बालविवाह तर होत नाहीत ना याची पहाणी केली होती. पण सगळचं निरर्थक ठरलं. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या ललिता दवे सांगतात, राजस्थानमध्ये बालविवाहाची प्रथा अजूनही नियमित सुरू आहे. अखा तीज तसचं देव उठणी एकादशीच्या दिवशी तर इथे सर्रास बालविवाह होतात. प्रशासन, राजकीय पक्षांची उदासिनता असल्यामुळे सामाजिक संस्था सुध्दा यावर काही करू शकत नाहीत.जेव्हा बालविवाह सारख्या प्रश्नांना वाचा फोडण्याची वेळ येते. तेव्हा निवडणुकीत मतं विभागणीच्या भीतीने राजकीय पक्ष अशा प्रश्नांमध्ये पडायला तयार नाहीत. त्यामुळे 21व्या शतकातही बाल विवाह सारख्या प्रथा सुरू आहेत.

close