महापौर केबिन तोडफोडीच्या निषेधार्थ बेळगाव बंद

November 4, 2011 5:16 PM0 commentsViews: 5

04 नोव्हेंबर

महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व मराठी संघटनाच्यावतीनं आज बेळगाव बंद पुकारण्यात आला आहे. बेळगावच्या महापौर आणि उपमहापौर यांच्या ऑफिसची काल कन्नड रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. त्याच्याच निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. आज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील एस.टी.सेवा बंद ठेवण्यात आली असून शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बेळगाव बाहेरून शहरात येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. काही वेळात एकीकरण समितीच्यावतीनं संभाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चाही काढला. या मोर्चामध्ये सर्व कार्यकर्ते काळी फिती दाखवून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा निषेध केला. कर्नाटक सरकारची दडपशाही सुरूच आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 15 कार्यकर्त्यांनी पोलिसांनी अटक केली.

कोल्हापुरात शिवसेनेनंही पुकारला बंदबेळगावमध्ये महापौर केबिन्सच्या तोडफोडीचा कोल्हापुरातही निषेध केला जात आहे. शिवसेनेनं कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. कोल्हापूर इथं शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला. तसेच बिंदू चौकात शिवसैनिकांनी कर्नाटक पासींगचा ट्रक फोडला आणि एका कानडी व्यक्तीच्या दुकानावरही शिवसैनिकांनी दगडफेक केली. कोल्हापुरात कर्नाटक सरकार विरोधात शिवसेनेनं आंदोलन पुकारलं.

close