आयबीएन लोकमत इम्पॅक्ट : बेकायदेशीर बांधकामावर हातोडा

November 3, 2011 12:59 PM0 commentsViews: 10

03 नोव्हेंबर

पुण्यातील वारजे माळवाडी भागात एका सोसायटीच्या मोकळ्या जागेवर बेकायदेशीरपणे बांधेलेल्या शानू पटेल या शाळेचं बांधकाम पाडायला सुरूवात झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या विभागामार्फत ही कारवाई होत आहे. आयबीएन लोकमतने ही बाब उघड केल्यामुळे यांची दखल घेत अखेरही कारवाई करण्यात आली. पुण्यात वारजे माळवाडी भागात गिरीश सोसायटीच्या 3,192 स्क्वेअर फूट मोकळ्या जागेवर सोसायटीचे तत्कालीन चेअरमन शानू पटेल यांनी हायस्कूल बांधलं. सोसायटीमधे 70 बंगले आहेत. 7-12 चा उतारा नसताना खोटी कागदपत्रं सादर करून जागेचा बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा रहिवाश्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई होती.

close