मुंबईत बिल्डराच्या कार्यालयावर गोळीबार

November 4, 2011 11:18 AM0 commentsViews: 2

04 नोव्हेंबर

भांडुपमध्ये समर्थ बिल्डरच्या ऑफिसवर आज दुपारी 12 च्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. हे दोन इसम मोटारसायकलवरून आले होते. कार्यालयाजवळ येताच कार्यलयाच्या दिशेने तीन राऊंड फायर केले. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. यावेळी कार्यालयात सुरक्षा रक्षकला मात्र किरकोळ जखम झाली. ऐन दुपारी ही घटना घडल्यामुळे परिसरात घबराट पसरली. बिल्डरवर दहशत निर्माण करण्यासाठीच हा हल्ला झाला असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते आरोपींचा शोध घेत आहे.

close