आर्थिक धोरणं, भांडवलशाहीचा निषेध !

November 4, 2011 11:42 AM0 commentsViews: 3

04 नोव्हेंबर

ऑक्युपाय वॉल स्ट्रीट या अमेरिकेत झालेल्या आंदोलनाच्या धर्तीवर आज मुंबई शेअरबाजाराच्या बाहेर ऑक्युपाय दलाल स्ट्रीट आंदोलन करण्यात येतं आहे. डाव्या पक्षांनी पुढाकार घेतलेल्या या आंदोलनात महाराष्ट्र स्टेट बँक एम्पॉईज फेडरेशन, ऑल इंडिया बँक एम्पाईज फेडरेशन, शिवराज्य पार्टी यांचाही समावेश आहे.

भांडवलशाही आणि सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध या आंदोलनाद्वारे केला जातोय. यातल्या काही आंदोलकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मल्टी नॅशनल बँकांना देण्यात येणारी सवलत, बँकांचे वाढते एनपीए (NPA) आणि सरकारची त्याविषयीची धोरणं याचा निषेध या आंदोलनाद्वारे केला जात आहे.

अमेरिकेमध्ये बुडलेल्या बँका आणि सरकारची धोरणं याविरोधात ऑक्युपाय वॉल स्ट्रीट आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आणि याला अमेरिकन लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक युरोपियन देशातही अशाप्रकारे आंदोलन करण्यात आलं. असेच आंदोलन दिवाळीनंतर मुंबईत करण्याचा इशारा डाव्या पक्षांनी दिला होता. त्यानुसार आज मुंबईत ऑक्युपाय दलाल स्ट्रीट आंदोलन करण्यात येतं आहे.

close