पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीत खिंडार ?

November 4, 2011 11:57 AM0 commentsViews: 2

04 नोव्हेंबर

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवारांचे कट्टर समर्थक मानल्या जाणार्‍या दोन आमदारांनीच आता बंडाची तलवार उपसली आहे. ते आमदार आहेत विलास लांडे आणि लक्ष्मण जगताप. लांडे आणि जगताप यांनी राष्ट्रवादीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेतील सत्ताधारी आपल्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा या दोन आमदारांचा आरोप आहे. त्यांच्या मागण्या त्वरीत मान्य न झाल्यास पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अण्णा हजारेंचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही या आमदारांनी दिला. या आमदारांच्या मागण्यांकडे आणि त्यांनी दिलेल्या इशार्‍याकडे राष्ट्रवादी काँग्रेसला दुर्लक्ष करुन चालणार नाही.

close