राज ठाकरे, निरुपम, आझमींची वक्तव्ये तपासणार

November 4, 2011 5:10 PM0 commentsViews: 1

04 नोव्हेंबर

परप्रांतीयांवरुन गेले काही दिवस पुन्हा एकदा भडकाऊ भाषणं सुरू झाली आहेत. ही वक्तव्य तपासण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हे आदेश दिले. नागपुरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उत्तर भारतीयांना ठरवले तर मुंबई बंद पडू शकते असं वादग्रस्त विधान केलं होतं. निरुपम यांच्या विधानामुळे सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अगोदर शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी निरुपम यांचा ठाकरी शैलीत समाचार घेतला. त्यानंतर कृपाशंकर सिंह आणि अबू आझमी यांनी परप्रांतीच्या बाजूने विरोधकांवर तोफ डागली. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे स्टाईलने हल्लाबोल केला त्यामुळे निरुपम, राज ठाकरे, अबु आझमी यांची वक्तव्य तपासण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहे. याबाबत पोलिसांना दोन दिवसात अहवाल द्यायचा आहे.

close