अडवाणींची जनचेतना यात्रा मुंबईत दाखल

November 4, 2011 2:07 PM0 commentsViews: 6

04 नोव्हेंबर

भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची जनचेतना यात्रा आज 26 व्या दिवशी मुंबईत दाखल झाली. ऐरोली भांडूप चेकपोस्टवर या यात्रेचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्रातील भाजपचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. यानंतर ही यात्रा मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड मार्गे जोगेश्वरीपर्यंत पाहोचलीय. रात्री 8 वाजताच्या सुमारास बोरीवली इथल्या कोरा केंद्र ग्राऊंडवर लालकृष्ण अडवाणींची जाहीर सभा होणार आहे. बोरीवली इथंच उद्या सकाळी लालकृष्ण अडवाणी पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर त्यांची यात्रा गुजरातच्या दिशेने रवाना होईल.

दरम्यान, जनचेतना यात्रेच्या निमित्ताने तळेगाव इथं सभा झाली. सभेच्या ठिकाणी मावळ गोळीबारात मृत्यूमुखी केलेल्या मृतांच्या नातेवाईकांची अडवाणींनी भेट घेतली. अडवाणींनी त्यांचं सांत्वन केलं. मावळमधील शेतकर्‍यांवर आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारात 3 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता..

close