पालिका निवडणुकीत सुनील देशमुखांची वेगळी ‘चूल’ !

November 4, 2011 2:19 PM0 commentsViews: 14

04 नोव्हेंबर

बंडखोरी आणि पक्षातून बाहेर पडून आपल्याच पक्षाला आव्हान देण्याची भूमिका या वेळच्या महापालिका निवडणुकीत अधिकाधिका दिसून येत आहे. तिकडे अमरावतीमध्ये देखील माजी महसूलमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील देशमुख गेल्या विधानसभा निवडणुकीपासून नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर आता सुनील देशमुखांनी स्वतःचा जनविकास काँग्रेस हा पक्ष स्थापन करुन अमरावती महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला.

आगामी अमरावती महानगर पालिकेची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असून राष्ट्रीय पक्षाच्या निलंबित नेत्यांमुळे ही निवडणुकीला रंगत चढणार आहे. सध्या अमरावती महानगर पालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असून राष्ट्रवादीचा महापौर तर काँग्रेसचा स्थायी समिती सभापती आहे.1990 पासून काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्रीपदी राहिलेले डॉ. सुनील देशमुख यांना डावलून राष्ट्रपती पुत्र राजेंद्र शेखावत यांना उमेदवारी दिल्याने डॉ. देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी केल्याने त्यांना काँग्रेसने निलंबित केले. सुरवातीला अनेक नगरसेवक हे डॉ.देशमुख यांच्या बाजूने होते. परंतु हळूहळू त्यापैकी त्यांचे निकटचे पाच सहा नगरसेवक वगळता आमदार राजेंद्र शेखावत यांच्या तंबूत दाखल झाले. आता डॉ.देशमुख यांनी जनविकास काँग्रेस नावाचा पक्ष काढला असून येणार्‍या महापालिका निवडणुकीमध्ये ते सर्व ताकदीनिशी आपले उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले.

मला काँग्रेसमधून काढले असले तरी काँग्रेस माझ्या रक्तात अल्याचे देशमुख सांगतात. येणार्‍या निवडणुकीमध्ये आम्ही समविचारी पक्षांशी युती करुन निवडणूक लढवणार असल्याचे देशमुख यांचे मत आहे. जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून जनता कुणाच्या पाठीशी आहे. खरी काँग्रेस कोणती हे आपण पक्षश्रेष्ठींना दाखवून देणार असल्याचे सांगतात.

काँग्रेससारखीच अवस्था भाजपची झाली आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीदरम्यान सध्या विधानपरिषद सदस्य असलेले आणि माजी महसूल मंत्री जगदीश गुप्ता यांनाही पक्षाने निलंबित केले आहे. भाजपच्या 15 नगरसेवकांपैकी नऊ ते दहा नगरसेवक जगदीश गुप्ता यांच्या पाठीशी आहेत जगदीश गुप्ता हेही या निवडणुकीमअधये आपले उमेदवार उभे करणार आहेत. याचा भाजपला फटका बसणार आहे. तेही भाजपने निलंबित केले असले तरी आपली विचारधारा भाजपची असल्याचे सांगतात

या दोन दिग्गजांखेरीज बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमानही आपले उमेदवार उभे करणार आहेत. आठवले यांच्या रिपाईची शिवसेनेसोबत युती होणार असल्याने समीकरण बदलणार आहे. सुनील देशमुखांमुळे काँग्रेसला जगदीश गुप्तांमुळे भाजपला तर खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हेकेखोरपणामुळे सेनेतून सोमेश्वर पुसदकर आणि दिनेश बूब यांना जिल्हा आणि शहर अध्यक्ष पदावरुन काढल्यामुळे शिवसेनेचा एक गट शिवसेनेवर नाराज आहे. या महापालिका निवडणुकींमध्ये सुनील देशमुख , आमदार जगदीश गुप्ता, राष्ट्रवादीचे संजय खोडके या गटाची युती होण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे ही एकूणच रंगतदार होण्याचे चिन्ह आहे.

close