नाशिकमध्ये इंद्रधनुष्य युवा महोत्सव आयोजित

November 5, 2011 1:59 PM0 commentsViews: 5

05 नोव्हेंबर

यंदाचा इंद्रधनुष्य हा आंतरविद्यापीठ युवा महोत्सव नाशिकमध्ये होत आहे. या वर्षी आरोग्य विज्ञान विद्यापीठाला हा महोत्सव आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल कृष्ण नारायणन यांच्या हस्ते या महोत्सवाचं उदघाटन करण्यात आलं. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ तसेच वैद्यकीय उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डी. पी. सावंत हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. चार दिवस चालणार्‍या या महोत्सवात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. महोत्सवानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजनसुद्धा करण्यात आलं आहे.

close