सत्यम घोटाळा प्रकरणी राजू यांना जामीन

November 4, 2011 4:51 PM0 commentsViews: 21

04 नोव्हेंबर

सत्यम कॉम्प्युटर्सचे संस्थापक रामलिंगम राजू यांनी आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यांचे भाऊ बी रामा राजू आणि सत्यमचे माजी मुख्य वित्त अधिकारी व्ही. श्रीनिवास यांनाही जामीन मिळाला. सत्यम कॉम्प्युटर्समध्ये 14 हजार कोटींचा घोटाळा झाला होता. त्याप्रकरणी गेले 2 वर्षं 8 महिन्यांपासून सत्यम राजू तुरुंगात होते. पण सीबीआयने त्यांच्याविरोधात अजून चार्जशीटच दाखल केली नाही. त्यामुळे कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.

close