निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात खड्डामुक्त ‘मिशन’ !

November 5, 2011 2:14 PM0 commentsViews: 2

विनय म्हात्रे, ठाणे

05 नोव्हेंबर

सगळीकडंच सध्या निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचा धडाका उडालेला दिसतोय. अशाच कामांची घोषणा करुन ठाणेकरांना महापालिकेने दिवाळी भेट दिली आहे. ठाणे शहर खड्डामुक्त करण्यासाठी रस्त्याच्या डांबरीकरण केलं जाणार आहे. याकामासाठी तब्बल 240 कोटी रुपये ठाणे महापालिका खर्च करणार आहे. या कामांची निविदाही काढण्यात आली.

सध्या कुठल्याही महापालिका क्षेत्रात रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यामुळं आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाणे महापालिकेनं रोड व्हिजनच्या माध्यमातून ही कामं हाती घेतली आहेत. म्हणजेच पॉलीमॉर मॉडीफाय बीटूमीन या तंत्रज्ञानानं रस्ते तयार केले जाणार आहेत. पाच वर्ष या रस्त्यांची लाईफ असेल. पहिले तीन वर्ष रस्त्यांची दुरुस्ती ठेकेदार करणार आहेत. शहरातल्या 257 रस्त्यांचं डांबरीकरण होणार आहे. यानंतर शहरातील सर्व रस्ते सुसज्ज होतील.

कल्याण-डोंबिवलीप्रमाणे ठाण्यातील निवडणुकही खड्‌ड्यांच्या मुद्यावरुन गाजू शकते. पण खड्‌ड्यांच्या कामांमुळे सत्ताधार्‍यांनी विरोधकांच्या या मुद्यातली हवाच काढून घेतली.

यापूर्वी युटीडब्यूटी (UTWT) पध्दतीचे 25 किलोमीटरचे रस्ते आणि सिमेंट क्राँकिटची कामं यापूर्वीच महापालिकेनं हाती घेतली आहेत आणि यासाठी बजेटमध्ये तशी तरतूदही करण्यात आली.

याकामातून शहरातील 250 किलोमीटरचे रस्त्यांचे डांबरीकरण तसेच क्राँकिटीकरण होणार आहे. ज्याप्रमाणात रस्त्यांवर खर्च केला जाणार आहे. त्यातुलनेत त्याचं दर्जात्मक काम होणार का पाहणं औत्सुक्याचं असेल.

रस्त्यांची दुरुस्ती

- पॉलीमॉर मॉडीफाय बीटूमीन तंत्रज्ञान वापरणार- रस्त्यांचं लाईफ 5 वर्ष- पहिले तीन वर्ष ठेकेदारच करणार रस्त्यांची दुरुस्ती- 257 रस्त्यांचं डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण

close